अम्मुकेअर चारिटेबल ट्रस्ट व प्रीशा फाउंडेशन च्या वतीने महिलांकरिता मोफत शाळा सुरू

अम्मुकेअर चारिटेबल ट्रस्ट व प्रीशा फाउंडेशन च्या वतीने महिलांकरिता मोफत शाळा सुरू

अम्मु केअर चारिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन कायमच समाजामधील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कामे करत आले आहेत. त्याचबरोबर महिलांच्या विकासाकरिता व सक्षमीकरणाकरीता देखील अहोरात्र मेहनत घेत आहेत.

WhatsApp Image 2021 03 10 at 8.26.22 AM


आपल्या देशामध्ये स्त्री ही अनेक क्षेत्रांमध्ये पुढे गेलेली आहे. त्याचबरोबर अनेक पदांवर स्वतःची कामगिरी उत्तम पणे बजावत आहे. परंतु आजही जिथे शिक्षणाचा अंधकार आहे त्याठिकाणी आजही महिलांवरील अन्याय अत्याचार पूर्णतः थांबलेले नाहीत.
अशातच काल अम्मु केअर चारिटेबल ट्रस्ट व प्रीशा फाउंडेशन च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत गरीब घरातील महिलांकरिता शाळा सुरू करण्यात आली.
त्याचबरोबर या शाळेमार्फत त्यांना लागणाऱ्या सर्व शालेय वस्तू व शिक्षण मोफत दिले जाणार आहे.
तसेच कार्यक्रमादरम्यान महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ देखील करण्यात आला तसेच अम्मु केअर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रीशा फाउंडेशन मधील महिला प्रतिनिधींचा सन्मान ही करण्यात आला.
महिलांना आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींशी सामना करावा लागतो. अशातच मासिक पाळीच्या वेळी होणारे त्रास त्याचबरोबर त्याविषयीच्या
असलेल्या समस्या या विषयी अनेक महिला बोलणे टाळतात परंतु अम्मु केअर चारिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांना मासिक पाळी च्या वेळी असणाऱ्या समस्यांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

WhatsApp Image 2021 03 10 at 8.26.31 AM

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत