अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप येत असल्यामुळं दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Amit Thackeray gets discharged from hospital)

अमित ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र, ती निगेटिव्ह आली होती. याशिवाय, त्यांचा मलेरिया चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता. आता प्रकृती ठणठणीत झाल्यामुळं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

मनसेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यापासून अमित ठाकरे हे पक्षाच्या कामात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. करोनाच्या काळातही ते सातत्याने लोकांच्या अडीअडचणी समजून घेत होते. अनेक गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणत होते. काही मुद्द्यांवर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते. डॉक्टरांचा व अंगणवाडी सेविकांचा प्रश्नही त्यांनी सरकारकडे मांडला होता. आरे येथील मेट्रो कारशेडच्या घडामोडींवरही ते लक्ष ठेवून होते. सरकारनं ‘आरे’तील कारशेड हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमित यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही केले होते. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत सरकारमधील काही आमदारांनीही केलं होतं.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत