अभिनेता भरत जाधव यांच्याकडून कोरोना रुग्णांना मदत

अभिनेता भरत जाधव यांच्याकडून कोरोना रुग्णांना मदत

मुंबई : देशातील कोरोना रुग्णवाढीचा वाढता वेग अजूनही कायम आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात सर्वाधिक ७७३ रुग्ण्यांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ६६,८३६ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणेही अवघड होत आहे. काही रुग्ण तर रुग्णालयाच्या बाहेर रांगाच्या रांगा लावताना दिसत आहे. अशावेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट्स, हॉल, गाळे हे कोरोना रुग्णासांठी द्या, असे आवाहन मराठी अभिनेता भरत जाधव यांनी केलं आहे.

भरत जाधवच्या सोसायटीमध्ये ही संकलप्ना आधी अंमलात आणली होती. त्यामुळे त्यांनी तेच उदाहरण देत कशाप्रकारे कोरोनाबाधितांची आपण मदत करू शकतो, हे सहजपणे जनतेला पटवून दिलं आहे.

काय आहे ही संकल्पना?

भरतने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ही संकल्पना समजावून सांगितली. त्याने असे लिहिले की, ‘सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे. माझ्या सोसायटीमध्ये चार जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट १ बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट्स ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्ता, औषधे देत होता. रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्यांचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केले. १५ दिवसांनी सर्वजण बरे झाले. आता तेच फ्लॅट्स इमर्जेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊन आपले कर्तव्य करण्याची.’

https://www.instagram.com/p/COAPDnOBa3f/?igshid=jkflv7f6lvit

भरत जाधवची ही संकल्पना नेटकऱ्यांनाही आवडली. ‘लोकांना सध्या मदतीची फार गरज असून ही संकल्पना अंमलात आणता येईल’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘खरोखर स्तुत्य उपक्रम आहे हा,’ असं दुसऱ्याने म्हटलं. त्यामुळे सर्वांनीच ह्या कठीण काळात एकमेकांना मदत केली पाहिजे. आपण एक भारताचे सुज्जान नागरिक म्हणून ‘एक हात मदतीचा’ हे कर्त्यव पार पाडूच शकतो.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत