अभिनेता अनशुमन विचारेचा नवीन अल्बम होतोय व्हायरल!

अभिनेता अनशुमन विचारेचा नवीन अल्बम होतोय व्हायरल!

Actor Anshuman Vichare's new album is going viral!

WhatsApp Image 2021 07 03 at 11.19.50 AM 1

नुकताच अभिनेता अनशुमन विचारेचा आलेला नवीन अल्बम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला आलेला दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या अल्बमचं अनोख्या पध्दतीने स्वागत केलं असून विशेष म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कोणता अल्बम आहे. हा अल्बम नटेश्वरी म्युझिक प्रस्तुत, श्री सखाराम बापु कातुर्डे निर्मित आणि सौ गौरी मारुती चव्हाण दिग्दर्शित “तर तुला काय सोन लागलंय का” या गाण्यावर अनशुमनचा नवीन अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे

महाराष्ट्राची हास्य जत्रेत अनेकांना पोट धरून हसवल्यानंतर, कॉमेडी-बिमेडी या हास्य मालिकेतून लोकांचं मनोरंजन करत असताना. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळात या अल्बमचं शुटिंग झालं. त्याचबरोबर हा अल्बम लोकांच्या पसंतीला आल्याने अनशुमन विचारे सुध्दा अधिक आनंदी आहे. तसेच वेगळं काम करण्यात मला मजा येते असंही अंशुमन विचारे यांनी सांगितलं आहे.

मुळात एका खेड्यात या अल्बचं शुटिंग झालं असून त्या मधील कलाकार ही गावकडचे असल्याचे दिसते. तसेच अल्बम मधील मुझिक पध्दत अनेकांना आवडल्याचं प्रेक्षकांचं मतं आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत