अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने मारली बाजी, तर डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओने मारली बाजी;

अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोनने मारली बाजी, तर डाऊनलोड स्पीडमध्ये रिलायन्स जिओने मारली बाजी;

महाराष्ट्र, : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने 4G डाऊनलोड स्पीड मध्ये एप्रिल मध्ये दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. एप्रिल २०२१ मध्ये रिलायन्स जिओने २०.१ मेगाबाइट प्रति सेकंद (Mbps) चा डेटा डाऊनलोड रेट सोबत 4G स्पीड चार्टला टॉप केले आहे. तर, वोडाफोनने एप्रिल मध्ये 6.7Mbps सोबत अपलोड मध्ये स्पीड मध्ये टॉप केले आहे. ही माहिती टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या लेटेस्ट डेटा मधून देण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात रिलायन्स जिओची डाउनलोड स्पीड आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या तुलनेत ३ पट अधिक राहिली आहे. वोडाफोन आयडिया सेलुलरने आपल्या मोबाइल बिझनेसचा वोडाफोन आयडिया लिमिटेडच्या रुपात मर्ज केले आहे. परंतु, सेक्टर रेग्युलेटर ट्राय आता दोन्ही कंपन्यांचे वेगवेगळे नेटवर्क स्पीड डेटा रिलीज करते. ट्रायच्या डेटानुसार, एप्रिल मध्ये वोडाफोनची डाऊनलोड स्पीड 7 Mbps राहिली. तर आयडिया आणि एअरटेलची डाउनलोड स्पीड अनुक्रमे ५.८ आणि ५ Mbps राहिली.

अपलोड स्पीडमध्ये वोडाफोन टॉपवर
अपलोड स्पीड मध्ये वोडाफोन टॉपवर राहिली आहे. एप्रिल महिन्यात वोडाफोनची स्पीड 6.7 Mbps राहिली. तर एअरटेलची अपलोड स्पीड 3.9 Mbps राहिली. डाऊनलोड युजर्सला इंटरनेट वेगाने कंटेट पर्यंत पोहोचण्यास मदत करते. अपलोड स्पीड युजर्संना आपल्या कॉन्टॅक्टला वेगाने पिक्चर आणि व्हिडिओ पाठवण्यास मदत करते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत