अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? : नितेश राणे

अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? : नितेश राणे

निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) अनागोंदी कारभार, बदल्या, पदोन्नतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक शहर पोलिसात दिली आहे. शिवाय, या तक्रारीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांचाही उल्लेख आहे.

यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी यावरून मंत्री अनिल परब व शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “सध्याच्या कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी कशी होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग मातोश्रीवरील त्या खास व्यक्तीला इतकी विशेष वागणूक कशासाठी? या प्रकरणी सीबीआय चौकशी केल्यास न्याय मिळेल…त्यापेक्षा कमी काहीच नाही.” असं नितेश राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार, गैरकारभाराचे अनेक दाखले देत पंचवटी पोलीस ठाण्याकडे इ मेलद्वारे तक्रार दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत