अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना अटक

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना अटक

anil deshmukh's PA arrested by ED

नवी मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कचाट्यात अडकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुल करण्याचे गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सीबीआयने तपास सुरू केला. त्यानंतर शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईच्या घरावर ईडीने छापे टाकले. त्याचप्रमाणे त्यांच्या घराची झडती घेताना ते स्वतः दौऱ्यावर होते आणि निवासस्थानी फक्त त्यांचा परिवार उपस्थित होता. आज शनिवारी अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक (पीए) संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली.

शुक्रवारी पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना अटक केल्याचे सांगितले. ‘वाझे प्रकरणी अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली. आता पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांना देखील अटक होईल.’ असे किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील ईडीने काल छापेमारी केली होती. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत