अधिकाऱ्याने केली शेतकऱ्यांना मारहाण ; पोटात घातली लाथ

अधिकाऱ्याने केली शेतकऱ्यांना मारहाण ; पोटात घातली लाथ

The officer beat up the farmers; kick in the stomach

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचौर भागात एका शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्य़ांकडून तेथील बंधकाम थांबण्यात आले. यावेळी सांचोर एसडीएम आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण सुरु झाली. मोठ्या संख्येने गावकरी घटनेच्या ठिकाणी जमा झाले. एसडीएम भूपेंद्र यादव हे नरसिंगराम चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.शेतकरी हे भारत माला प्रोजेक्ट (Bharat Mala Project) अंतर्गत मोबादल्याची मागणी करत होते. अमृतनगर येथून जामनगरच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वेचं काम हे गुरुवारी सुरू झालं आहे. याच दरम्यान काही गावकरी तेथे जमले आणि त्यांनी हे काम थांबवलं. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत