अजगर आढळल्यावर फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने केली नागरिकांची मदत

अजगर आढळल्यावर फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने केली नागरिकांची मदत

Friends of Nature institute helps citizens when python is found

-विठ्ठल ममताबादे

नवी मुंबई- पावसाळ्यात अनेक अडचणीच्या ठिकाणी साप-अजगर आढळण्याची शक्यता असते. ज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी सर्पमित्रच नागरिकांची मदत करण्यास पुढे सरसावतात. ०६ जुलै २०२१ रात्री ११. ४७ च्या दरम्यान चिरनेर गावातील विजय मुंबईकर यांच्या घराच्या पायरीवर अजगर बसून असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या हेल्पलाईनवर (9594969747) संपर्क साधला आणि फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी तो अजगर पकडला व त्याची वनखात्याला कल्पना दिली. वनखात्यासमक्ष तो अजगर वनपरिक्षेत्रात मुक्त केला.यावेळी भाऊसाहेब म्हात्रे, सनी ढोले, मेजर बोरसे, संतोष इंगोले तसेच या संस्थेचे जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर व राकेश शिंदे हजर होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत